file photo 
नागपूर

सहा महिन्यांपूर्वी केला प्रेमविवाह आणि आता झाले असे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लकडगंज परिसरातील मालधक्‍का भागात एका 30 वर्षीय युवकाचा बेदम मारहाण केल्यानंतर गळा आवळून खून करण्यात आला. ही थरारक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. धीरज ऊर्फ भोला भगवान साळवे (वय 30, रा. गरोबा मैदान, नागपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज साळवे हा मूळचा कुही तालुक्‍यातील वरंभा या गावाचा रहिवासी आहे. तो ट्रकचालक असून गेल्या सहा महिन्यांपासून नागपुरात राहतो. त्याचे सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला आहे. अज्ञात आरोपीने रात्रीच्या सुमारास त्याचा गळा आवळून हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याचा एक पायसुद्धा तुटलेल्या अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हिवरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनाकरिता मेयो रुग्णालयात रवाना केला. शवविच्छेदन अहवालानंतर तपासाला अधिक गती येणार असून सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. हा कुणी, आणि का केला, याबाबत पोलिस माहिती काढत आहेत. 

गावात झाला होता वाद 
धीरज साळवे याचे नागपुरातील एका युवतीवर प्रेम होते. त्याने प्रेयसीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांच्या परवानगीने "लव्ह कम अरेंज मॅरेज' केले. गेल्या आठ दिवसांपूर्वी पती-पत्नी वरंभा गावी गेले होते. तेथे गावातील चार युवकांसोबत भांडण आणि हाणामारी झाली होती. तो वाद मौदा पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. 

धीरज जुगाराचा शौकीन 
ट्रकचालक असलेल्या धीरजला जुगाराचा शौक होता. त्यामुळे तो अनेक ठिकाणी जुगार खेळायला जात होता. जुगारातील हार-जीतच्या पैशावरून वाद झाल्यानंतर गेम केल्याचा संशय पोलिसांना आहे. धीरजच्या उजवा पायाचे हाड मोडलेले आहे तर त्याचा गळ्यावर दोरीने आवळल्याचा खुणा आहेत. कुण्यातरी ओळखीच्या आरोपींनी हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची १५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र परीक्षा; पाचवी- आठवीच्या विद्यार्थ्यांची २६ एप्रिल आणि चौथी- सातवीची २६ एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा

अग्रलेख - पुढचे पाऊल

जप कधी, कुठे, कसा? सगळे प्रश्न विसरा… ‘श्वासागणिक नामस्मरण’ हेच खरं साधन!

Immunity Boosting Soup: थंडीमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी १५ मिनिटांत बनवा दुधीभोपळा अन् शेवग्याचं सुप, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 08 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT